दैनिक “नवराष्ट्र” चे कोकणातील पुरस्कार जाहीर

Google search engine

दैनिक “नवराष्ट्र” चे कोकणातील पुरस्कार जाहीर

देवगड तालुक्यातील चार जणांचा समावेश

डॉ. माधव घोगरे यांना आदर्श पशुवैद्यकीय अधिकारी पुरस्कार

संतोष बिर्जे यांना आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार

वैभव करंगुटकर यांना आदर्श सक्षम राजकीय युवा नेतृत्व पुरस्कार

महेश ताम्हणकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

उद्या चिपळूण येथे होणार पुरस्कार प्रदान सोहळा

 

देवगड / प्रतिनिधी

पत्रकारिता क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या ‘दैनिक नवभारत’ समूहाच्या ‘दैनिक नवराष्ट्र’ तर्फे कोकणच्या मातीतील रत्ने शोधून त्यांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत आपल्या कार्यातून ‘आदर्शवाद’ जपणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.

यामध्ये देवगड तालुक्यातील पंचायत समितीचे कक्ष अधिकारी संतोष ब्रिजे यांना आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार, देवगड ते सहाय्यक पशुधन आयुक्त डॉ.माधव घोगरे यांना पशुवैद्यकीय अधिकारी पुरस्कार, भाजपचे युवा नेते वैभव करगुटकर यांना सक्षम राजकीय युवा नेतृत्व पुरस्कार, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे

या पुरस्कारांच वितरण सोहळा चिपळूण येथील अतिथी हॉल येथे ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वा. होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना . उदय सामंत, गृहराज्यमंत्री ना योगेश कदम त्याचबरोबर आमदार भास्करराव जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या ऐतिहासिक सन्मान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे, असे आवाहन नवभारत व नवराष्ट्र समूहाचे महाव्यवस्थापक सचिन फुलपगार यांनी केले आहे.