राजू टायगर आरोंदा संघ ठरला आमदार चषकाचा मानकरी

Google search engine

राजू टायगर आरोंदा संघ ठरला आमदार चषकाचा मानकरी

यंगस्टार देवगड प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा

मालिकावीर केतन म्हात्रेला मिळाली टीयागो कार

बुवा तारी यांनी आमदार चषकाचा दर्जा उंचावला – पालकमंत्री नितेश राणे

प्रशांत वाडेकर : देवगड

देवगड येथील यंगस्टार क्रिकेट क्लबने युवा नेते व देवगड जामसंडे नगरपंचायतीचे स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या यंगस्टार प्रीमियर लीग स्पर्धेच्या शनिवारी रात्री झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात ए. के. स्पोर्ट्स वरवडे संघाचा पराभव करून राजू टायगर आरोंदा संघाने आमदार चषकावर आपले नाव कोरले. तर मालिकावीर केतन म्हात्रे याने मालिकावीर साठी असलेली टाटा टियागो कार जिंकली.

यंगस्टार देवगड संघाचे आमदार चषक प्रीमियर लीग स्पर्धेचे दुसरे वर्ष असून स्पर्धा मोठ्या दिमाखात यशस्वीरित्या पार पडली. पालकमंत्री नितेश राणे यांनी या स्पर्धेला भेट देऊन बुवा तारी व यंगस्टार क्रिकेट क्लबच्या या स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक केले.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे स्थानिक नेते बाळ खडपे व भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, पडेल मंडळ अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, पंचायत समिती सभापती गणेश राणे, देवगड जामसंडे शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, उद्योजक एकनाथ तेली, जिल्हापरिषद सदस्या सावी लोके, नगरसेविका ॲड. प्रणाली माने, नगरसेवक संतोष तारी, रोहन खेडेकर, माजी नगरसेवक व्हि. सी. खडपकर, माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर,गणपत गावकर,  मिलिंद माने आदी उपस्थित होते.