देवगड हापूसच्या अस्मितेसाठी आणि माणुसकीच्या नात्यासाठी एकनाथ तेली यांची आर्त हाक
प्रशांत वाडेकर (देवगड)
जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याने बागायतदारांना जागतिक ओळख मिळवून दिली आहे. मात्र, सध्याच्या कठीण परिस्थितीत काही बागायतदारांकडून होणारे वर्तन आणि विक्रेत्यांची होणारी कुचंबणा यावर प्रसिद्ध आंबा व्यावसायिक श्री. एकनाथ केशव तेली यांनी आपले परखड आणि भावनिक विचार मांडले आहेत. “पैशापेक्षा माणसं आणि माणुसकी जपणं हीच खरी संपत्ती आहे,” असे आवाहन त्यांनी सर्व आंबा बागायतदारांना केले आहे.
श्री. तेली यांनी केलेले आवाहन पुढील प्रमाणे, फळांचा राजा देवगड हापूस आंबा यांच्या सर्व पाईकांना म्हणजेच सन्मानीय सर्व आंबा बागायतदारांना माझा मनापासून नमस्कार……
सध्याच्या गंभीर गोष्टी चालल्या आहेत त्याबद्दल मी माझे केविलवाने विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे काही चुकल्यास माफ करा
सन्माननीय माझ्या आंबा बागायतदार बंधूंनु आणि भगिनींनो माता पित्यांनु त्या फळाच्या राजाने म्हणजेच देवगड हापूसने आपल्या कर्तुत्वावर जिद्द आणि चिकाटीवर जगावर तुम्हाला आणि आम्हाला नेलेले आहे त्याचीच काळजी काही आंबा बागायतदार घेत नाही आहेत व काही आंबा बागायतदार हृदयापासून काम करतात माझ्या विचारांच्या बागातदारांना असं वाटतं की त्यांची काळजी पहिली घ्यावी.
विनाकारण त्याची लक्तर आपला अधिकार नसताना वेशीला टांगूया नको यावर बरेच काही बोलण्यासारखा आहे वेळ आल्यावर नक्कीच बोलू
कीटकनाशक खते बी बियाणे विक्रेते यामध्ये आमच्या आंबा बागायदारां साठी कळकळीने व तळमळीने सर्वच विक्रेते काम करत असतात .
माझ्या प्रिय आंबा बागायतदारांनो आज ज्या विक्रेत्यांनी आपणा सर्वांना बँकेचे करोडो रुपये वापरून आपल्या सर्वांना मदत व सहकार्य काही शेतकऱ्यांना माल उधारीमध्ये देऊन सहकार्य केले आहे सगळ्याचा विचार करता साधी बाब नाही करोडो रुपयांचा माल उधारी मध्ये दिला असता तर केवढा मोठा प्रसंग आला असता हे स्वतः शेतकऱ्यांनी स्वतःला प्रश्न विचारून आत्मपरीक्षण करणे च योग्य ठरेल आज काही बेजबाबदार व्यक्ती 40% पैसे द्यायचे असे म्हणतात सन्माननीय सर्वांना माझी विनंती आहे ही जर दुकानं तुमची असती आणि तुम्ही करोडो रुपयांचा माल उधारीवर दिला असता तर असं झालं तर योग्य आहे काय ? जो विक्रेता चुकीच्या पद्धतीने काम करतो शेतकऱ्यांना फसवतो तो रस्त्यावर आलाच पाहिजे किंवा उध्वस्त झालाच पाहिजे पण आमचे विक्रेते प्रामाणिकपणे काम करत असताना आणि सर्वांना सहकार्य करत असताना तो उध्वस्त होणे हे योग्य आहे काय? आणि त्यानंतर भविष्यात सर्व बाजूंनी होणारी सहकार्य क्षणात उध्वस्त करायचं काय ? असलेले संबंध काही क्षणात उध्वस्त करायचे काय? उधारी दिलीच नसती तर हे प्रश्न आले असते काय? काहीजण शहाणी माणसं दादागिरी करतात घराबाहेर ओढून काढू आणि मारून टाकू अशी धमकी देतात त्यातही कोण कमी नाही पण आमची संस्कृती आमचे विचार तसे नाहीत म्हणून आम्हाला त्या मार्गाने जायचं नाही ज्यांना जायचं आहे आणि भविष्याचा गोळा करून घ्यायचा आहे त्यांना जाऊ दे आपल्या संस्कृतीला न पटणारे अतिलांचनास्पद शब्दप्रयोग वापरले जातात ते सुद्धा सज्जनाच्या संस्कारांना पटणारे नाहीत व आमच्या देवगड हापूस राज्याच्या दरबारात टिकणारे नाहीत,
स्वार्थासाठी आमच्या हापूस आंब्याच्या राजाची लक्तर वेशीला टांगून चालेल काय?
असे बरेच प्रश्न विचारवंतांना पडलेले असतीलच अशांनी पुढे येणे आज काळाची गरज आहे आमच्या मते आज पैसा मोठा नाही तर माणसं मिळवणं आणि माणुसकी जपणं आणि आपलं भविष्य सुखाची समाधानाचे व आनंदाचे व सर्व गुण संपन्न करणं हीच खरी करोडोंची संपत्ती आहे
अजून एक बाब सध्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता शेतकऱ्यांसाठी 10: 26: 26 आणि 9 :24: 24 महाधन कंपनीची तसेच बागायत दारांना लागणारी सर्वच खते सुमारे 700 टन गोडाऊन मध्ये आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकेच्या सहकार्याने उपलब्ध करून ठेवलेला आहे एवढ्या धाडसीपणाने आम्ही सगळ्याच बाजूने काम करतो, आलेले अस्मानी संकट खूपच धक्कादायक आहे तरीही त्यातून आपण सहिसलामत बाहेर पडू त्यासाठी आपले विचार सद्सद्विवेक बुद्धीला पटणारे आणि परमेश्वराच्या पवित्र दरबारात टिकणारे असावेत हीच हात जोडून नम्र विनंती
बोलायला गेल्यास बरेच विचार मांडता येतील काही चुकल्यास लहान तोंडी मोठा घास घेतो असं वाटत असल्यास माफ करा आपला समजून मला माफ करा
हा खटाटोप आपल्या देवगड हापूस राजाचा मान उंचावण्यासाठी आहे त्यासाठी आपण हातात हात घालून आणि खांद्याला खांदा लावून त्याची सेवा करू या पर्यायाने निसर्गाची आणि परमेश्वराची सेवा करूया आणि आपलं भविष्य उज्वल व सुजलाम सुफलाम करूया…….. धन्यवाद


