विजयदुर्ग सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव

Google search engine

विजयदुर्ग सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव

 

देवगड / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने सरपंचपदाच्या आरक्षणामध्ये केलेल्या सुधारणेनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या तालुक्यात सरपंचपदांची संख्या जास्त आहे तिथे बदल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार देवगड तालुक्यात (एकूण ७२ ग्रामपंचायती) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) मधील १ पद कमी करून ते खुल्या प्रवर्गात वाढवण्यासाठी शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी हे आरक्षण चिठ्ठीद्वारे विजयदुर्ग ग्रामपंचायत सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार शीतल जाधव यांनी जाहीर केले.
या आरक्षणावेळी उबाठा शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र जोगल, शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर, शिरगांव सरपंच समीर शिरगांवकार, तोरसोळे सरपंच तेजस्विनी पवार आदी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार संतोष खरात, विवेक शेठ उपस्थित होते.