वाडा येथे २६ व २७ जुलै रोजी एसटी महामंडळ सवलत कार्ड विशेष शिबिर
ग्रामपंचायत सदस्य सौ. अंकिता वाडेकर यांचे आयोजन
सुहास उर्फ पिंट्या वाडेकर व शशांक तावडे यांची संकल्पना
वाडा / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील वाडा येथे २६ आणि २७ जुलै रोजी एसटी महामंडळाच्या विविध सवलत कार्डांसाठी दोन दिवसांच्या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सदस्य सौ. अंकिता सुहास वाडेकर यांच्या वतीने आणि सुहास (पिंट्या) वाडेकर व शशांक तावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम होत आहे.
या कॅम्पमध्ये महिलांसाठी ५०% सवलत देणारे ‘महिला सन्मान कार्ड’, ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि विद्यार्थ्यांसाठीची सवलत कार्डे जागेवरच काढून दिली जातील. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी रु. १९९/- शुल्क असून, इच्छुकांनी सोबत आधार कार्ड आणि मोबाईल फोन आणणे आवश्यक आहे.
हा कॅम्प २६ व २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत ‘ग्रामपंचायत वाडा हॉल’ येथे होणार आहे.
अधिक माहितीसाठी सरपंच सुनिल जाधव (9307297945) शक्ती केंद्र प्रमुख अविनाश सहस्त्रबुद्धे (9420983590) राजा परब 8830780703, रवि मांजरेकर 9403561095, , दिलीप वाडेकर 9422387164, संजय तावडे 9422824751, आशिष जाधव 8830967567, सौ. स्नेहल मेस्त्री 9403495086 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


