⭕*जि.प .बांधकाम घोटाळा प्रकरणी फरार ठेकेदार ओंकार पडते याला हायकोर्टाकडून अटकपूर्व जामिन मंजूर*

Google search engine

⭕*जि.प .बांधकाम घोटाळा प्रकरणी फरार ठेकेदार ओंकार पडते याला हायकोर्टाकडून अटकपूर्व जामिन मंजूर*

⭕*पोलीस तपासाला धक्का*

⭕*संशयितातर्फे ॲड.कौस्तुभ मराठे ॲड. मिहिर मोंडकर व ॲड.गौरव पडते यांनी केला यशस्वी युक्तिवाद*

⭕*अजून तीन संशयित अद्याप फरार*

⭕*गॉडफादर सुद्धा अज्ञात*

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये बांधकाम विभाग मुख्य कार्यकारी अभियंता यांची बनावट सही करून रक्कम रुपये ६ लाख ७६ हजार पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ५ संशयित आरोपी पैकी फरार ठेकेदार अभियंता ओमकार नंदकुमार पडते राहणार कुडाळ याला हायकोर्टाच्या सर्किट बेंच ने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे .

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांना जानेवारी २०२६ मधे त्यांच्या सहीचे बनावटीकरण करून विविध सार्वजनिक कामांची देयके व प्रस्ताव सादर केले गेले होते व त्यांचे आधारे थेट सरकारी तिजोरीतून रक्कम ६ लाख पेक्षा जास्त पैसे आरोपींच्या बँक खात्यात वर्ग झाले होते . हा प्रकार लक्षात आल्यावर थेट कार्यकारी अभियंत्यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशन मधे ठेकेदार ओमकार पाताडे,ओंकार पडते, मोहन केळुसकर लक्ष्मण राऊळ व मंदार दामोदर यांचेवर गुन्हा दाखल केला होता .

सिंधदुर्गनगरी पोलिसानी बी एन एस कायदा कलम ३१८ ३३८ ३४० सारखी गंभीर कलमे लावून तपास सुरू केला होता . या प्रकरणातले सर्व आरोप गुन्हा दाखल होताच फरारी झाले होते . खुद्द पालकमंत्री यांनी यामधील “गॉड फादर” शोधला जाईल असे घोषित केले होते .

दरम्यान फरार आरोपींपैकी पडते, पाताडे व केळुसकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन फेटाळला गेला होता .

तथापि काल दिनांक २०/७/२०२६ रोजी बॉम्बे हायकोर्टच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने यातील ओमकार पडते रा. कुडाळ याला पहिला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे . संशयित आरोपीतर्फे ॲड .कौस्तुभ मराठे, ॲड. मिहिर मोंडकर व ॲड.गौरव पडते यांनी यशवी युक्तिवाद केल्याने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
आता बाकीचे आरोपीना अटकपूर्व मिळतो का याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे .