देवगड जामसंडे नगरपंचायत क्षेत्रात ५३५ गुरांची नोंद
प्रभाग १६ मध्ये सर्वाधिक, तर चार प्रभागांत एकही पशूधन नाही!
दोन दिवसांत ५२ गुरांना टॅगिंग सोबत लंपी आजाराचे लसीकरण सुरू
स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांची माहिती
देवगड: प्रतिनिधी
देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील गुरांचा अधिकृत अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून, संपूर्ण नगरपंचायत क्षेत्रात एकूण ५३५ गुरांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गुरांना टॅगिंग लावण्याची मोहीम जोरात सुरू असून दोन दिवसांत ५२ गुरांना टॅगिंग करण्यात आले आहे. टॅगिंग बरोबर गुरांना लंपी आजाराचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांनी दिली.
या अहवालावरून शहरातील विविध प्रभागांतील पशुधनाची रंजक व महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. नगरपंचायतीच्या १७ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वाधिक ९१ गुरे आढळली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर प्रभाग १४ (७४ गुरे) आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रभाग ७ (६० गुरे) यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे प्रभाग ८, ९, १२ आणि १३ या चार प्रभागांमध्ये एकही पशू नाही (शून्य नोंद) अशी स्थिती आहे.
पशुधनाची वर्गवारीनुसार मुख्य माहिती:
गायींची संख्या सर्वाधिक: नगरपंचायत क्षेत्रात एकूण २३३ गायी असून शहरातील एकूण गुरांमध्ये गायींचे प्रमाण सर्वाधिक आहे. (प्रभाग १६ मध्ये सर्वाधिक ४३ गायी).
वासरू व म्हशींचे प्रमाण:
क्षेत्रात १०८ वासरे आणि ७९ म्हशी नोंदवण्यात आल्या आहेत.
इतर जनावरे: बैल ४५, पाडा २९, रडक/रेडा २३, आणि पाडी १८ अशी नोंद आहे.
प्रभागनिहाय गुरांची प्रमुख आकडेवारी:
सर्वाधिक गुरे असलेले प्रभाग:
प्रभाग १६ – ९१
प्रभाग १४ – ७४
प्रभाग ७ – ६०
प्रभाग १० – ५२
प्रभाग ३ – ५१
नगण्य/कमी संख्या असलेले प्रभाग:
प्रभाग १७ – ७
प्रभाग ५ – ११
प्रभाग ६ – १७
शून्य गुरे असलेले प्रभाग: * प्रभाग ८, ९, १२ आणि १३.
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या या अहवालावरून शहरीकरण झालेल्या प्रभागांमध्ये जसे की प्रभाग ८, ९, १२, १३ पशुधन पूर्णपणे नाहीसे झाले असून, काही विशिष्ट प्रभागांमध्येच दुग्धव्यवसाय आणि पशुपालन अजूनही मोठ्या प्रमाणावर टिकून असल्याचे स्पष्ट होते.


