पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड जामसंडे शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
मच्छिमार शिबिर, आरोग्य तपासणीसह शैक्षणिक साहित्याचे होणार वाटप
नगरपंचायतीच्या सर्व १७ प्रभागांमध्ये साजरे होणार उपक्रम
शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर यांची माहिती
देवगड: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या २३ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप देवगड जामसंडे शहराच्या वतीने संपूर्ण शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती भाजप शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी दिली आहे.
वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांची सुरुवात रविवार २१ जून रोजी भव्य मच्छिमार कल्याणकारी योजनेच्या शिबिराने होणार आहे. तर सोमवार आणि मंगळवारी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण पूरक उपक्रमांची रेलचेल शहरात पाहायला मिळणार आहे.
रविवार २१ जून: मच्छिमार बांधवांसाठी विशेष कल्याणकारी शिबिर मच्छिमार बांधवांच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी रविवार, दि. २१ जून रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ‘सांस्कृतिक भवन, जामसंडे’ येथे मत्स्य विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
देवगड जामसंडे शहरातील सर्व मच्छिमार बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर आणि युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमवार २२ जून रोजी प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजप शहराध्यक्ष वैभव करंगुटकर आणि माजी नगरसेवक संजय तारकर यांच्या सौजन्याने सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार २३ जूनरोजी वाढदिवसाच्या दिवशी होणारे मुख्य उपक्रम मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या मुख्य दिवशी मंगळवारी शहरात प्रभागांनुसार खालील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
सकाळी ८ वाजता श्री देव ब्राम्हणदेव मंदिर येथे नितेशजी राणे साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी विशेष अभिषेक केला जाईल.
श्रीराम मोरेश्वर गोगटे विद्यामंदिर येथील ५ गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचा वर्षाभराचा संपूर्ण शैक्षणिक खर्च शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांच्या वतीने केला जाणार आहे.
प्रभाग क्र. ६ मध्ये माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर आणि नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांच्या वतीने देवगड जामसंडे शहरातील सर्व जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांना ५०० दप्तरांचे वाटप करण्यात येणार आहे.
स्वच्छता व आरोग्य सभापती नगरसेवक बुवा तारी आणि नगरसेवक संतोष तारी यांच्या वतीने शहरातील मच्छी विक्रेत्या महिलांना छत्र्यांचे वाटप केले जाईल, तसेच मच्छिमार बांधवांसाठी विमा संरक्षण पॉलिसी सुरू करण्यात येणार आहे.
प्रभाग क्र. ३ मध्ये नगरसेविका ऋचाली पाटकर यांच्यावतीने जि.प. शाळा खाकशी व अंगणवाडीत साहित्य वाटप.
प्रभाग क्र. ५ मध्ये नगरसेविका मनिषा जामसंडेकर प्रबुद्ध नगर येथे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप.
प्रभाग क्र. ७ मध्ये नगरसेवक रोहन खेडेकर यांच्याहस्ते जि.प. शाळा मळई येथे साहित्य वाटप.
प्रभाग क्र. १० मध्ये उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांच्या हस्ते जि.प. किल्ला शाळा येथे साहित्य वाटप.
प्रभाग क्र. १५ मध्ये नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल यांच्या हस्ते जि.प. शाळा भटवाडी, बेलवाडी आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना रेनकोट, खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप.
प्रभाग क्र. १७ (बुथ क्र. ७३) – जि.प. शाळा तारामुंबरी येथे साहित्य व खाऊ वाटप.
प्रभाग क्र. ९ मध्ये माजी नगराध्यक्षा प्रणाली माने यांच्या वतीने महिलांना, तर प्रभाग क्र. १४ मध्ये माजी शहर अध्यक्ष योगेश पाटकर यांच्या वतीने नागरिकांना छत्र्यांचे वाटप केले जाणार आहे.
नगरसेविका आद्या गुमास्ते यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना वृक्ष वाटप तसेच शहरात वृक्षारोपण करण्यात येईल.
या सर्व समाजोपयोगी कार्यक्रमांना माजी आमदार अजितराव गोगटे, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ यांच्यासह देवगड जामसंडे शहरातील आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख आणि बुथ अध्यक्ष प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. सर्व नागरिकांनी आणि संबंधित लाभार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.


