खा. नारायण ​राणे यांचे अमृतमहोत्सवी वर्ष अन् नरेन्द्र मोदी यांची पंतप्रधानपदाची १२ वर्षे

Google search engine

खा. नारायण ​राणे यांचे अमृतमहोत्सवी वर्ष अन् नरेन्द्र मोदी यांची पंतप्रधानपदाची १२ वर्षे

देवगड भाजपच्यावतीने लोकोपयोगी उपक्रमांनी झाले साजरे

 

देवगड / प्रतिनिधी 

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप देवगड-जामसंडे शहराच्यावतीने विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे अमृत महोत्सवी वर्ष हे देवगड जामसंडे शहराच्या वतीने वर्षभर साजरे केले जाणार आहे. दर महिन्याच्या १० तारीखला विविध लोकाभिमुख कार्यक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जेष्ठ नेते बाळ खडपे, शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर तसेच नगरपंचायत गटनेते शरद टूकरूल यांच्या संकल्पनेतून बुधवारी शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले.

त्यानुसार या महिन्यातील ​कार्यक्रमाची सुरुवात देवगड-जामसंडे गावचे ग्रामदैवत श्री दिर्बादेवीची ओटी भरून आणि साकडे घालून करण्यात आली. यानंतर प्रभाग क्रमांक १४ धोपटेवाडी येथे भाजपचे माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर यांनी स्वखर्चाने गरीब व गरजू चंद्रकांत दत्तात्रय धोपटे यांना घर बांधून दिले. या घराचा ताबा माजी आमदार ॲड. अजित गोगटे व ज्येष्ठ नेते बाळ खडपे यांच्या हस्ते धोपटे कुटुंबाला देण्यात आला.

​तसेच, रानडे कॉलनी आणि श्रीकृष्ण नगर परिसरात नागरिकांच्या सुविधेसाठी प्रत्येकी एक अशा दोन बेंचेस बसविण्यात आल्या. प्रभाग क्र. १२ मध्ये युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीच्या देवगड-जामसंडे येथील वायरमन कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.

​याशिवाय, प्रभाग क्रमांक १ मधील खाडीकिनारी पर्यटक व नागरिकांच्या सोयीसाठी वैभव करंगुटकर यांच्या सौजन्याने दोन बेंचेस, तर जामसंडे येथील आप्पासाहेब धर्माधिकारी सद्गुरू बैठक परिसरात बसण्यासाठी वैभव करंगुटकर व दया पाटील यांच्या सहकार्याने दोन बेंचेस उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रभाग क्रमांक ६ मधील तेलीवाडी बसस्टॉप येथे योगेश चांदोस्कर यांच्या सौजन्याने एक बेंच बसविण्यात आला.

​या सर्व कार्यक्रमांना माजी आमदार ॲड अजित गोगटे, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, नगरसेवक गटनेते शरद ठुकरूल, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, महिला पदाधिकारी प्रियांका साळस्कर, महिला शहराध्यक्षा तन्वी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष उमेश कनेरकर, संजय तारकर, नगरसेवक चंद्रकांत कावले, रोहन खेडेकर, मनीषा जामसंडेकर, माजी नगरसेवक व्हि. सी. खडपकर, बापू धुरी, ज्ञानेश्वर खवळे, सुभाष धुरी, माधव कुलकर्णी यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.