विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री शंकर गायकर यांनी घेतले श्री देव कुणकेश्वराचे दर्शन
देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला सत्कार
कुणकेश्वर / प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री शंकर गायकर यांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराला सोमवारी भेट देऊन कुणकेश्वरचे दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत विजय राऊत, महेश नाईक हरिश्चंद्र राऊत, अनिल येवले उपस्थित होते.
तसेच देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश वाळके, सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, सदस्य संजय वासुदेव वाळके, सरपंच महेश ताम्हणकर आदी उपस्थित होते.


