डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाटचा ९८.०३% निकाल

Google search engine

​डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाटचा ९८.०३% निकाल

सार्थक प्रभू विद्यालयात प्रथम

 

देवगड / प्रशांत वाडेकर

मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट या विद्यालयाचा फेब्रुवारी/मार्च २०२६ चा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ९८.०३ टक्के लागला आहे. विद्यालयातील ५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

​विद्यालयात सार्थक चंद्रकांत प्रभू याने ८९.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. अदिती निलेश साळुंके ८५.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. धनश्री संजय काडगे ७७.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

​विद्यालयाचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे: ​प्रथम क्रमांक: सार्थक चंद्रकांत प्रभू (मराठी माध्यम) – ४४८/५०० (८९.६०%) ​द्वितीय क्रमांक: कु. अदिती निलेश साळुंके (सेमी इंग्रजी) – ४२८/५०० (८५.६०%) ​तृतीय क्रमांक: कु. धनश्री संजय काडगे (मराठी माध्यम) – ३८९/५०० (७७.८०%)

​या घवघवीत यशाबद्दल मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.