अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा’चा दहावीचा निकाल ९७.२२ टक्के
कु. आर्या अमोल जोशी हिने ८८.६० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम
देवगड: प्रशांत वाडेकर
मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेचा (एसएससी) निकाल जाहीर झाला असून अनंत कृष्ण केळकर हायस्कूलने ९७.२२ टक्के निकालाची नोंद केली आहे. या परीक्षेत कु. आर्या अमोल जोशी हिने ८८.६० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला.
इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. रिया उमेश जाधव ८६.२० टक्क्यांसह द्वितीय, कु. नायकवडे स्वालिहा रफिक ८५.२० टक्क्यांसह तृतीय, कु. जाधव वैष्णवी चंद्रशेखर ८५.०० टक्क्यांसह चतुर्थ आणि कु. नर वैदेही शंकर ८२.८० टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर राहिली.
- शाळेतून एकूण ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी ८ विद्यार्थी विशेष योग्यतेत, २३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १० विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल शैक्षणिक संस्थेतर्फे आणि प्रशालेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.


