उमा मिलिंद पवार हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
स्वरा सावंत ९५.८० टक्के गुणांसह प्रशालेत पहिली
देवगड : प्रशांत वाडेकर
मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त (दहावी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, देवगड येथील उमा मिलिंद पवार इंग्लिश मिडीयम हायस्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
प्रशालेतून या परीक्षेसाठी एकूण ४४ विद्यार्थी बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये कु. स्वरा सुनील सावंत हिने ९५.८०% गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला.
कु. दिशिता सुहास हरम हिने ९१.८०% गुणांसह द्वितीय, तर कु. ओम भूषण पोकळे याने ९१.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
निकालानुसार, विशेष श्रेणीमध्ये २१ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे, तर १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि ७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक-पालक संघाने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.


