देवगड जामसंडे नगरपंचायतीतर्फे २२ मार्च रोजी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

Google search engine

देवगड जामसंडे नगरपंचायतीतर्फे २२ मार्च रोजी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

देवगड /प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने शहरातील महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपंचायत वर्धापन दिनाचे निमित्त साधून २२ मार्च २०२६ रोजी हे कार्यक्रम होणार आहेत.

​महिलांच्या दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात विरंगुळा मिळावा आणि त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या दिवशी महिलांसाठी पाककला स्पर्धा, आरोग्यविषयक मार्गदर्शन, महिलांशी संबंधित विविध शासकीय योजना व कायद्यांची माहिती तसेच गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यासोबतच महिलांसाठी खास मनोरंजनात्मक कार्यक्रमही होणार आहेत.​शहरातील जास्तीत जास्त मुली व महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवगड जामसंडे नगरपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.