पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट व शैक्षणिक साहित्य वाटप

Google search engine

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट व शैक्षणिक साहित्य वाटप

नगरसेवक तथा गटनेते शरद टूकरूल यांचे आयोजन

 

​देवगड / प्रतिनिधी

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड-जामसंडे नगरपंचायत प्रभाग क्र. १६ चे नगरसेवक तथा गटनेते शरद टूकरूल यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट, शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

​हा कार्यक्रम मंगळवार २३ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना रेनकोट आणि शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक शरद टूकरूल यांच्या माध्यमातून प्रभागातील जिल्हा परिषद शाळा, भटवाडी, जिल्हा परिषद शाळा, बेलवाडी या शाळांमध्ये वाटप करण्यात येणार आहे.

​पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान ठेवून गरजू आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदत व्हावी व पावसाळ्यात त्यांची सोय व्हावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, शिक्षक व भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गटनेते शरद टूकरूल यांच्या वतीने करण्यात आले आहे.