खा. नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त असलदे वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
देवगड /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार मा. नारायणराव राणे साहेब यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस पदार्पण वर्षानिमित्त रविवारी १० मे २०२६ रोजी असलदे येथील ‘द्विविजा वृद्धाश्रम’ येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ नेते बाळ खडपे, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर आणि गटनेते शरद ठुकरुल यांच्या मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृद्धाश्रमातील गरजू ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन वापराच्या वस्तू भेट देण्यात आल्या.
याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, गटनेते शरद ठुकरुल, युवा शहराध्यक्ष दया पाटील, योगेश पाटकर, उल्हास मणचेकर, नगरसेवक रोहन खेडेकर, व्हि.सी. खडपकर, गौरव कांदळगावकर यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


