गिर्ये येथे ११ ते १४ मे भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव
गिर्ये येथे सात फूट उंचीच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना
१२ मे रोजी पडेल येथे होणार भव्य धम्म मेळावा
पालकमंत्री नितेश राणे, डॉ. भीमराव आंबेडकर, विजय उर्फ भाई गिरकर यांची प्रमुख उपस्थिती
माजी राज्यमंत्री भाई गिरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील मौजे गिर्ये येथे भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, १२ मे २०२६ रोजी आयोजित धम्म मेळाव्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार नितेशजी राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. विजय (भाई) गिरकर, देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ विजयदुर्ग विभागाचे अध्यक्ष मा. डी. के. पडेलकर, भन्तेजी पारा बुद्धीश्री, भन्तेजी बुद्ध मित्र थेरो, भन्तेजी बुद्धपाल थेरो, भन्तेजी राहुल मित्र थेरो, भन्तेजी प्रज्ञा बोधी, भन्तेजी अनुराधा, तसेच मा. श्यामसुंदर जाधव ओंबळकर, मा. आनंद कासार्डेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत., अशी माहिती माजी राज्यमंत्री भाई गिरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उत्तम कांबळे, अनिल पुरळकर, दिलीप वाडेकर, दीपक गिरकर उपस्थित होते.
भाई गिरकर म्हणाले, हा धम्म मेळावा साई गणेश मंगल कार्यालय, पडेल कॅन्टीन येथे सकाळी १०.३० वा. पार पडणार आहे.
मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळ मुंबई/ग्रामीण, पंचशील महिला मंडळ तसेच देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ११ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता बुद्ध पूजापाठाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता महिलांचा हळदीकुंकू समारंभ पार पडणार असून दुपारी १२.३० वाजता संपूर्ण गावासाठी भोजनदान करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता बुद्धमूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून परिसरात धार्मिक व उत्सवी वातावरण निर्माण होणार आहे.
१२ मे रोजी धम्म मेळावा व बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना
मंगळवार, १२ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते ७ फुटी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता जाहीर कार्यक्रम व धम्म मेळावा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास पालकमंत्री मा. नामदार नितेशजी राणे साहेब, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ma. डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. विजय (भाई) गिरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री ९ वाजता गिर्ये ग्रामपंचायत समोर मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम रंगणार आहे.
१३ रोजी विविध कार्यक्रम
बुधवार, १३ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बुद्ध पूजापाठ, सकाळी १० वाजता मुलांच्या विविध स्पर्धा तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रात्री ९ वाजता गावातील मुलांच्या समूह नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तसेच गुरुवार, १४ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत भव्य GPL क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवासाठी मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळाचे अध्यक्ष दीपक नामदेव गिरकर, सचिव प्रशांत भिकाजी गिरकर, ग्रामीण अध्यक्ष संतोष भिकाजी गिरकर, ग्रामीण सचिव सचिन भालचंद्र गिरकर, पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा अनघा अनंत गिरकर, सचिव संजना संजय गिरकर, ग्रामीण अध्यक्षा आरती संतोष गिरकर, ग्रामीण सचिव अक्षता सिद्धांत गिरकर आदी पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
धम्म मेळाव्यासाठी के. एस. कदम, सुर्यकांत साळुंके, मनोहर सावंत, उत्तम कांबळे, दिलीप वाडेकर, सत्यवान पेंढारकर, तसेच सल्लागार सदस्य अनिल पुरळकर, संजय कांबळे, सुनील कांबळे, किशोर कांबळे यांच्यासह महिला कार्यकारिणीतील कनिष्ठत तिर्लोटकर, अर्पिता साळुंखे, सुरभी पुरळकर, संजीवनी गिरकर, अश्विनी पडेलकर, ऐश्वर्या कांबळे, मनाली वाडेकर, प्रियंका कदम तसेच नमिता कांबळे, रश्मी पडेलकर, सुप्रिया कांबळे, तन्वी पडेलकर आणि करुणा कांबळे आदी कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


