उमा मिलिंद पवार हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

Google search engine

उमा मिलिंद पवार हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

स्वरा सावंत ९५.८० टक्के गुणांसह प्रशालेत पहिली

 

देवगड : प्रशांत वाडेकर 

मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त (दहावी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, देवगड येथील उमा मिलिंद पवार इंग्लिश मिडीयम हायस्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

​प्रशालेतून या परीक्षेसाठी एकूण ४४ विद्यार्थी बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यामध्ये कु. स्वरा सुनील सावंत हिने ९५.८०% गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला.

कु. दिशिता सुहास हरम हिने ९१.८०% गुणांसह द्वितीय, तर कु. ओम भूषण पोकळे याने ९१.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

​निकालानुसार, विशेष श्रेणीमध्ये २१ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे, तर १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि ७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक-पालक संघाने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.