देवगडमध्ये २३ एप्रिलला अभिनेते अभय खडपकर यांच्याशी ‘मुक्तसंवाद’

Google search engine

देवगडमध्ये २३ एप्रिलला अभिनेते अभय खडपकर यांच्याशी ‘मुक्तसंवाद’

 

देवगड/प्रतिनिधी

उमाबाई बर्वे लायब्ररी आणि देवगड पेन्शनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तसंवाद’ या उपक्रमाचे दुसरे पुष्प आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देवगडचे सुपुत्र आणि प्रसिद्ध नाट्य, चित्रपट व मालिका अभिनेते श्री. अभय खडपकर यांच्याशी प्रकट मुलाखत व मनमोकळा संवाद होणार आहे.
​हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता देवगड येथील उमाबाई बर्वे लायब्ररी शेजारील स्नेहसंवर्धक मंडळाच्या सभागृहात पार पडणार आहे.

​अभय खडपकर यांनी मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयाने स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता रसिकांमध्ये आहे. या निमित्ताने त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देवगडमधील नागरिकांना मिळणार आहे.

​या कार्यक्रमाला सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उमाबाई बर्वे लायब्ररी आणि देवगड पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.