देवगडात रंगणार ‘स्मार्ट होम मिनिस्टर’चा खेळ

Google search engine

देवगडात उद्या रंगणार ‘स्मार्ट होम मिनिस्टर’चा खेळ

खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजन 

 

 

देवगड प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टी, देवगड तालुका यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा लोकप्रिय खासदार मा. नाम. नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष ‘स्मार्ट होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘खेळ पैठणीचा, सन्मान स्त्री शक्तीचा’ हे ब्रीद घेऊन रंगणारा हा सोहळा बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता जामसंडे येथे पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळ:

हा भव्य कार्यक्रम जामसंडे येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्ससमोरील पटांगण (फाटक क्लास) येथे आयोजित करण्यात आला आहे. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून महिलांच्या कलागुणांना वाव देणारे विविध खेळ आणि स्पर्धा रंगणार आहेत.

 

आकर्षक बक्षिसे आणि मानचिन्ह:

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. मुख्य स्पर्धेतील विजेत्यांसाठी खालीलप्रमाणे बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत:

  • प्रथम क्रमांक: आकर्षक पैठणी आणि सोन्याची नथ
  • द्वितीय क्रमांक: आकर्षक पैठणी
  • तृतीय क्रमांक: आकर्षक पैठणी

सेलिब्रिटींची उपस्थिती आणि लकी ड्रॉ:

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील नामवंत सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. तसेच, कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांसाठी ‘लकी ड्रॉ’ देखील काढण्यात येणार असून त्यात भाग्यवान विजेत्यांना विशेष बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

​भाजपा देवगड तालुक्याच्या वतीने या ‘स्मार्ट होम मिनिस्टर’ कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व महिलांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे व  स्त्री शक्तीचा सन्मान करणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.