तळेबाजार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव 

Google search engine

तळेबाजार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव 

 विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

देवगड / प्रतिनिधी

देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ, महिला सेवा संघ आणि तळेबाजार गावशाखा यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तळेबाजार येथील ‘बुद्ध चैत्य’ तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे १२ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महोत्सवाची सुरुवात १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान महाशिबिराने झाली आहे. त्यानंतर १४ एप्रिल रोजी मुख्य जयंती दिनी सकाळी १० वाजता पंचशील ध्वजारोहण व धम्म संस्कार विधी पार पडतील. अभिवादनासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विहार खुले राहणार आहे.

१५ एप्रिल रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात महिलांसाठी रांगोळी व तालुकास्तरीय पाककला स्पर्धा, तसेच सर्वांसाठी तालुकास्तरीय कराओके आणि वेशभूषा स्पर्धा पार पडतील. सायंकाळी ५:३० वाजता गावातून भव्य धम्मरॅली काढण्यात येणार आहे.

प्रमुख व्याख्यान आणि मार्गदर्शन

सायंकाळी ७ वाजता आयोजित अभिवादन सभेसाठी मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयातील पाली भाषा विभागाचे प्रा. विजय मोहिते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते “महाडचा धर्म संगर आणि त्याचे मानवी जीवनावर झालेले परिणाम” या विषयावर विचार मांडतील.

कार्यक्रमाची सांगता रात्री १० वाजता विविध गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने होईल. या सर्व कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ व महिला सेवा संघ, तळेबाजार यांच्या वतीने करण्यात आले आहे.