मळई येथे १ ते ३ एप्रिल कालावधीत हनुमान जन्मोत्सव सोहळा

Google search engine

मळई येथे 1 ते 3 एप्रिल कालावधीत हनुमान जन्मोत्सव सोहळा

 

देवगड : प्रतिनिधी

जामसंडे मळई येथिल हनुमान मंदीरामध्ये दि. 1 ते 3 एप्रिल या कालावधीत हनुमान मंदीर वर्धापन दिन व हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जामसंडे मळई येथील बाल मंडळ संगीत मेळा मळई या मंडळाच्यावतीने दि. 1 ते 3 एप्रिल या कालावधीत हनुमान मंदीरामध्ये श्री हनुमान मंदीर वर्धापन दिन, श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा व श्री सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आली असून यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.बुधवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वा.पासून पुजा आरती, लघुरूद्र, सायंकाळी महाआरती, स्थानिक भजने व रात्री 9 वाजता स्थानिक महिलांचा कलाविष्कार फुगडी हे कार्यक्रम होणार आहेत.

गुरूवार दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 6.33 वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा, आरती, दर्शन व तीर्थप्रसाद, पालखीप्रदक्षिणा, सकाळी 11 वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी 1 वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता महिलांसाठी होममिनिस्टर स्पर्धा, सायंकाळी 6 वाजता स्थानिक भजने, रात्री 10.30 वाजता धमाल विनोदी मालवणी दोन अंकी नाटक बायको शिवाय काय खरा नाय हे कार्यक्रम होणार आहेत.

शुक्रवार दि. 3 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता गुणगौरव सोहळा समारंभ संपन्न होणार असून 10.30 वाजता स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार दिंडी भजन सोहळा हा कार्यक्रम होणार आहे.