वाडा येथील उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
भाजप नेते बाळ खडपे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला प्रवेश
देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील वाडा येथील उबाठा कार्यकर्त्यांनी रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन भाजपाचे जेष्ठ नेते बाळ खडपे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी वाडा ग्रामपंचायत सदस्य, उपविभाग प्रमुख, बूथ प्रमुख तसेच कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
या प्रवेशकर्त्यामध्ये उपविभाग प्रमुख संजय तावडे, शाखा प्रमुख रविंद्र मांजरेकर, बूथ प्रमुख संदेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य वाडा अंकिता वाडेकर, विजय कारेकर, हेमंत पांचाळ, विद्या वाडेकर, विठ्ठल वाडेकर, संतोष जाधव, संतोष मेस्त्री, राजेंद्र वाडेकर, सत्यवान वाडेकर, कांता राऊळ ,भाग्यश्री वाडेकर, प्रवीण कानडे, धीरज मेस्त्री, सुशांत पांचाळ, विद्याधर पांचाळ, वैशाली वाडेकर, तेजश्री मांजरेकर यांचा समावेश आहे.
ज्येष्ठ नेते बाळ खडपे यांच्या प्रमुख उपस्थित प्रवेश झाला,. यावेळी पडेल मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर, देवगड मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, जिल्हा परिषद गटनेते संजय बोंबडी, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, अंकुश टूकरूल, संजना आळवे, देवगड जामसंडे शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, मकरंद जोशी, रामकृष्ण जुवाटकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. अवनी तेली, शशांक तावडे, सुवास वाडेकर, आशिष जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


