देवगड पंचायत समिती सभापतीपदी गणेश राणे तर उपसभापतीपदी अमोल लोके यांची निवड
उमेदवारी अर्ज दाखल
देवगड / प्रतिनिधी
देवगड पंचायत समितीच्या सभापतीपदी नाडण पंचायत समिती मधून बिनविरोध निवडून आलेले गणेश राणे यांच्या नावाची घोषणा पक्षाच्यावतीने करण्यात आली. तर उपसभापती पदी ठरल्याप्रमाणे शिवसेनेचे अमोल लोके यांची निवड झाली आहे.दुपारी १२.२० व. सुमारास दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी तहसीलदार रमेश पवार उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार ॲड अजित गोगटे. तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, महेश उर्फ बंड्या नारकर, डॉ. अमोल तेली, पडेल सरपंच भूषण पोकळे, किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर, पंचायत समिती सदस्य अंकुश टूकरूल, रविंद्र तिर्लोटकर, सादिक डोंगरकर आदी उपस्थित होते.
देवगड पंचायत सभापती पदाच्या शर्यतीत सदाशिव ओगले, अंकुश टूकरूल, रविंद्र तिर्लोटकर यांची नावे चर्चेत होती. मात्र अखेरच्या क्षणी भाजपने गणेश राणे नावावर शिक्का मोर्तब केले. गणेश राणे हे यापूर्वी मोंडपार सरपंच, पडेल जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना प्रशासन सांभाळण्याचा चांगला अनुभव आहे.
उपसभापतीपदी कुणकेश्वर पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेले शिवसेनेचे अमोल लोके यांची निवड करण्यात आली. अमोल लोके हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत. १९७२ नंतर प्रथमच लोकेंना उपसभापती पदाची संधी मिळाली.



देवगड पंचायत समिती सभापतीपदी गणेश राणे तर उपसभापतीपदी अमोल लोके यांची निवड