*कुणकेश्वर ग्रामपंचायतीत ‘जल महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ*
देवगड/ प्रतिनिधी
ग्रामपंचायत कुणकेश्वर येथे जल जीवन मिशन अंतर्गत ८ मार्च ते २२ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या “जल महोत्सव” कार्यक्रमाचा शुभारंभ गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व कुणकेश्वर सरपंच तथा प्रशासक महेश ताम्हणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला . यात पाण्याचे महत्त्व आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जल महोत्सवानिमित्त प्रभात फेरी, जलदिंडी, जल बंधन, पाणी गुणवत्ता प्रात्यक्षिक, जल संकल्प शपथ तसेच योजना हस्तांतरण समारंभ असे विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी गावाला “हर घर जल” म्हणून घोषित करण्याचा उपक्रमही राबविण्यात आला. हा उपक्रम यशस्वी होणेसाठी विस्तार अधिकारी ( ग्रा.प )तुषार हळदणकर व विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) दिपक तेंडुलकर यांनी विशेष नियोजन केल .
सदर कार्यक्रमास सरपंच तथा प्रशासक महेश ताम्हणकर , तंटामुक्त अध्यक्ष आचरेकर , कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली , शाखा अभियंता रोशन सुर्यवंशी , शाखा अभियंता संदीप पोवार ,वकिल अन्वी कुळकर्णी , वकिल परांजपे , संरक्षण अधिकारी गौरव एखंडे, ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, गोविंद घाडी, शशिकांत लब्दे ,गटसमन्वयक वैशाली मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते .
तसेच अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी , गावातील बचत गटातील महिला प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


