करिअर कट्टाचा उपक्रम : कर्ले महाविदयालयात मधुमक्षिका पालन कार्यशाळा संपन्न
देवगड : प्रतिनिधी
मधुमक्षिका पालन हा कोर्स नाही तर शेतीशी असलेली मैत्री आहे. नैसर्गिक साधनसमृद्धीने संपन्न असलेला पश्चिम घाटासारखा जैवविविधतेचा हॉटस्पॉट असताना केवळ प्रशिक्षणांचा अभाव असल्यामुळेच येथे मधाचे उत्पन्न होत नाही. करिअर कट्टाच्या मधुरक्रांतीला शैक्षणिक प्रकल्पाव्दारे चालना मिळेल असे प्रतिपादन करिअर कट्टाचे जिल्हा समन्वयक डॉ.अजित दिघे यांनी शिरगांव येथे केले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणऱ्या करिअर कट्टा विभाग तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी शिरगांवच्या पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयात मधुमक्षिका पालन कार्यशाळा पार पडली यावेळी विद्यार्थी, शेतकरी, बागायतदार महिला बचतगटाचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधताना डॉ. दिघे म्हणाले, मधुरक्रांतीमुळे ३०ते ४० टक्के फुलोऱ्याचे प्रमाण वाढेल परागीकरणाचा फायदा उत्पन्न वाढीसाठी होईल त्याच बरोबरोबर मध वॅक्स आणि रॉयल जेली सारखे उत्पन्नही घेता येईल.
खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मधपर्यवेक्षक शंकर चाटे म्हणाले, मधुमक्षिका पालनसाठी येथिल वातावरण पोषक आहे. व्यवसायमुळे राजेगारांच्या संधी उपलब्ध होतील नारळ,आंबा, काजू उत्पदनात निश्चित वाढ होईल. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन वनसंपदेचे धनसंपदेत रुपांतर करा.मधुरक्रांतीसाठी तरुणांनी पुढे यायला हवे असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम म्हणाले, बागायतीच्या उत्पनात दिवसेंदिवस घट होत असतानाच मधुरक्रांतीचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल शिक्षणसंस्था शेतकरी आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहे. शिरगांवचा मधुरक्रांतीचा उपक्रम जिल्ह्यासाठी आदर्शाव्रत ठरेल यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गणपत तावडे, बहुउदेशिय औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष उल्हास मणचेकर, खादी ग्रामोद्योगचे पर्यवेक्षक आदेश मर्गज, तुळशीदास गावडे, संस्वापदाधिकारी मंगेश लोके, प्रकाश धोपटे, अकॅडमिक कोऑरडीनेटर सिद्धी कदम, प्राध्यापिका डॉ.आरती भारमल, सोनाली ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करिअर कट्टा समन्वयक अक्षता मोंडकर यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य समिर तारी यांनी केले उपस्थितांचे आभार प्राध्यापक आशय सावंत यांनी मानले.
१०० मधुमक्षिका केंद्र सुरु करणार
मधुरक्रांती उपक्रमासाठी करिअर कट्टाच्या माध्यमातून २५-२५ प्राध्यापकांच्या बॅचेसना महाबळेश्वर येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून १०० मधुमक्षिका पालन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत त्यासाठी खादी ग्रामोद्योग महामंडळाचे सहकार्य तसेच विविध सीएसआर फंड मिळणार असल्याचे डॉ. दिघे यांनी यावेळी सांगितले


