पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त जामसंडे हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप

Google search engine

 

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त जामसंडे हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप

भाजपा शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर यांचा स्तुत्य उपक्रम 

 

देवगड /प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, भाजप देवगड शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर यांच्या वतीने जामसंडे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत शाळेतील गरजू मुलांना मोफत गणवेश, दप्तर आणि गरीब विद्यार्थ्यांची शाळेची वार्षिक फी भरण्यात आली.
​या सामाजिक कार्यक्रमाला माजी आमदार ॲड. अजितराव गोगटे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, नगरसेवक तथा गटनेते शरद ठुकरुल, महिला देवगड मंडळ अध्यक्षा उषःकला केळुसकर, नगरसेवक संतोष तारी, नगरसेविका प्रणाली माने, मच्छीमार नेते ज्ञानेश्वर खवळे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने, माजी नगरसेवक सुभाष धुरी आणि व्ही. सी. खडपकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.