पोंभुर्ले जिल्हा परिषद गटातील ३३ अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Google search engine

पोंभुर्ले जिल्हा परिषद गटातील ३३ अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन 

भाजपा पडेल मंडल अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर आणि   जि. प .महिला व बालविकास सभापती सौ. अनुराधा नारकर यांच्या वतीने केले होते आयोजन

 

देवगड (प्रतिनिधी):

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके सन्माननीय पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री मा. ना. नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पडेल मंडल यांच्या वतीने एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोंभुर्ले जिल्हा परिषद गटातील ३३ अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सर्व बालकांना छत्री व शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

​हा सामाजिक उपक्रम पडेल मंडल अध्यक्ष श्री. महेश (बंड्या) नारकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बालविकास सभापती सौ. अनुराधा महेश नारकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या मदतीमुळे अंगणवाडी कर्मचारी आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

​या जाहीर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून फणसगाव पंचायत समिती सदस्य समृद्धी चव्हाण, पोंभुर्ले पंचायत समिती सदस्य सादीक डोंगरकर, माजी सभापती श्री. रवी पाळेकर, श्री. विजय घरत, उदय पाटील, कृष्णा नर, संतोष चव्हाण, जयेश नर, महेश पडवाल, नितीन वरने, बाबू आडीवरेकर आणि कल्पेश नारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

​याशिवाय, पडेल विभागातील सर्व सरपंच, उपसरपंच, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख, पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचे पालक अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.