पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० स्कूल बॅगचे वाटप

Google search engine

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० स्कूल बॅगचे वाटप

योगेश व तन्वी चांदोस्कर दांपत्याचा स्तुत्य उपक्रम

देवगड: प्रतिनिधी 

मलय आणि बंदरे विकास मंत्री तथा देवगड-कणकवली-वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड-जामसंडे परिसरात एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, दिनांक २३ जून २०२६ रोजी सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत देवगड जामसंडे येथील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ५०० स्कूल बॅगचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

​हा स्तुत्य उपक्रम देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. ०६ च्या नगरसेविका तथा पाणी पुरवठा सभापती सौ. तन्वी चांदोस्कर आणि देवगड मंडल भा.ज.पा. सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांच्या माध्यमातून राबवला जात आहे.

​आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस गरजू विद्यार्थ्यांना ‘शैक्षणिक मदत’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय चांदोस्कर दांपत्याने घेतला आहे.

या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, संबंधित शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.