कुणकेश्वर येथे ८ जून रोजी क्षयरुग्णांना मोफत धान्य वाटप

Google search engine

कुणकेश्वर येथे ८ जून रोजी क्षयरुग्णांना मोफत धान्य वाटप

शासनाच्या ‘निक्षय मित्र’ उपक्रमांतर्गत कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे आयोजन

 

देवगड / प्रतिनिधी 

शासनाच्या ‘निक्षय मित्र’ (TB Mukt Bharat) उपक्रमांतर्गत देवगड तालुक्यातील क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ​हा कार्यक्रम सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे होणार आहे.

या उपक्रमासाठी तालुका आरोग्य कार्यालय, देवगड आणि जिल्हा क्षयरोग कार्यालय, सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभले आहे. ​याप्रसंगी सिंधुदुर्गचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे, देवगडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित ढवळे, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक सुहास कांबळे, मिठबांवचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल मेस्त्री व डॉ. मेहुल जाधव, आणि कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

​क्षयरोगमुक्तीसाठी आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमाचा लाभ संबंधित रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.