जामसंडे वेळवाडी टापू साठवण टाकीवरून पाण्याचा शुभारंभ
देवगड/ प्रतिनिधी
जामसंडे वेळवाडी येथे उभारण्यात आलेल्या साडेसहा लाख लीटर पाण्याच्या टाकीवरुन पाण्याचा शुभारंभ नगराध्यक्षा साक्षी प्रभू, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्षा सौ. मिताली सावंत, भाजपचे जेष्ठ नेते बाळ खडपे, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, गटनेते शरद टूकरूल, नगरसेवक रोहन खेडेकर, चंद्रकांत कावले, नगरसेविका रुचाली पाटकर, भाजपा शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, माजी शहर अध्यक्ष योगेश पाटकर, युवक शहर अध्यक्ष दयानंद पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, पाणी पुरवठा विभागाचे चारू पारकर, ललित चांदोस्कर आदी उपस्थित होते.


