भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकार्यांची भेट
देवगड-जामसंडे न. पं. हद्दीतील विकासकामांबाबत केली चर्चा
देवगड: प्रतिनिधी
भाजपा देवगड जामसंडे शहरच्या वतीने नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांबाबत माननीय मुख्याधिकारी यांच्यासमवेत एक महत्त्वाची बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत प्रामुख्याने नगरपंचायत मधील विविध विकासकामे, सध्या शहरात अर्धवट स्थितीत असलेल्या विकासकामांबद्दलच्या सूचना, तसेच पाणीपुरवठा दुरुस्तीकामाबद्दलचा आढावा घेण्यात आला. यासोबतच स्वच्छता समिती अंतर्गत येणाऱ्या सांडपाण्याविषयीच्या तक्रारींची माहिती घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत मुख्याधिकार्यांचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी भाजप जेष्ठ नेते बाळ खडपे, भाजपा नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, नगरसेवक सभापती सौ. तन्वी चांदोस्कर, श्री बुवा तारी, श्री रोहन खेडेकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा उषःकला केळुसकर, शहराध्यक्षा तन्वी शिंदे, नगरसेविका प्रणाली माने, भाजपा उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, योगेश पाटकर, शक्तीकेंद्र प्रमुख सुभाष धुरी, बाळा गावकर, माजी नगरसेवक उमेश कणेरकर, स्विकृत नगरसेवक चंद्रकांत कावले, शिवाजी कांदळगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


