तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे चा दहावीचा 95.91% निकाल

Google search engine

तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे चा दहावीचा 95.91% निकाल

तळेरे  / प्रतिनिधी 

फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय दहावीचा निकाल 95.91% लागला. या परीक्षेत एकूण 51 विद्यार्थी बसले होते पैकी49 विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांक स्वयम मिलिंद महाडिक 88.20% द्वितीय क्रमांक शुभम महेश तेली 87.40% तृतीय क्रमांक अथर्व संतोष जठार 84.20% या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण उर्फ दादा खटावकर स्थानिक शाळा समिती अध्यक्ष अरविंद महाडिक आणि शाळा समिती सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीव इतर शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांकडून विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करण्यात आले
सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच यशाचा टप्पा गाठता येतो असे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले