स्वातंत्र्य ही व्यक्तीच्या अस्तित्वाची, तिच्या प्रतिष्ठेची पूर्वअट आहे

Google search engine

स्वातंत्र्य ही व्यक्तीच्या अस्तित्वाची, तिच्या प्रतिष्ठेची पूर्वअट आहे

पोंभुर्ले येथे जयंती महोत्सव कार्यक्रमात मा. राही श्रुती गणेश यांचे प्रतिपादन

 

देवगड  / प्रतिनिधी 

देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ, महिला सेवा संघ, विजयदुर्ग विभाग, पोंभुर्ले बौद्धजन उन्नती मंडळ,  आदर्श महिला मंडळ, पोंभुर्ले यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जयंती महोत्सवात, स्वातंत्र्य, समता आणि सहभावाच्या साक्षीने, न्यायाची कास धरत, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी रस्त्याने प्रवास करणे हीच आपली खरीखुरी ओळख आहे असे प्रतिपादन संविधान अभ्यासक व लेखिका राही श्रुती गणेश,पुणे यांनी नागसेन बुद्ध विहार पोंभुर्ले,तालुका देवगड येथे केले.

येथील जयंती महोत्सव कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा संघाचे अध्यक्ष डी.के.पडेलकर होते तर पोंभुर्ले सरपंच- मान. प्रियांका धावडे, पोंभुर्ले पंचायत समिती सदस्य- मान.सादिक डोंगरकर, पोलीस पाटील- मान. राखी मोंडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक- मा. संजय कातिवले, पोलीस उपनिरीक्षक मालपे- मान.दशरथ चव्हाण, पुरळ गावच्या पोलीस पाटील मा. प्राची पुरळकर, मुटाट गावचे पोलीस पाटील अमित साळुंखे, समता प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे मा. महेश पेडणेकर, पोंभुर्ले बाग बौद्धवाडी येथील शिक्षक लांडे सर, देवगड तालुका सेवा संघाचे माजी अध्यक्ष मा. राजेश साळसकर, शिरगाव गावचे सरपंच मान. समीर शिरगावकर, कवी प्रकाश जाधव, बौद्ध उपासिका अर्चना मिठबावकर, संघाचे माजी अध्यक्ष, जयवंत मिठबावकर,सेवा संघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत साळुंखे, सचिव मनोहर सावंत, खजिनदार उत्तम कांबळे, सहसचिव दिलीप वाडेकर, सल्लागार सुनील कांबळे, किशोर कांबळे, संजय कांबळे, महेंद्र गिरकर, सुरेश साळुंखे, उदय पेंढारकर,जयवंत वाडेकर,सचिन गिरकर,संतोष गिरकर,दिलीप गिरकर, महिला सेवा संघाच्या अध्यक्षा अर्पिता साळुंखे, कार्याध्यक्षा सुरभी पुरळकर, उपाध्यक्षा संजीवनी गिरकर, खजिनदार मनाली वाडेकर, हिशोब तपासणीस प्रियंका कदम, सल्लागार नमिता कांबळे, रश्मी पडेलकर,पोंभूर्ले बौद्धजन उन्नती मंडळाचे अध्यक्ष सहदेव कांबळे, सचिव पांडुरंग कांबळे, आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा शितल कांबळे, सचिव करुणा कांबळे, सल्लागार चंद्रकांत कांबळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख मार्गदर्शक, विशेष अतिथी व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीबा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पोंभुर्ले बौद्धजन उन्नती मंडळाच्या स्थानिक कलावंतानी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सचिव मनोहर सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला तर प्रास्ताविक अर्पिता साळुंखे यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा ग्रंथ भेट व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक मान. राही श्रुती गणेश यांनी आपल्या भाषणात, समाजातील विषमतेवर बोलताना म्हटले की, विषमतेचा उगम निसर्गातच होतो त्यामुळे विषमता नैसर्गिक आहे अशी मांडणी काही वेळा केली जाते. हाताची पाचही बोटे सारखी नसतात, त्यामुळे लहान मोठे फरक, कमी जास्तपणा जगात असणारच अशीही मांडणी आपल्याला ऐकायला मिळते, तथापि हाताचा अंगठा वरच्या दर्जाचा आणि करंगळी खालच्या दर्जाची असं निसर्ग सांगत नाही. निसर्गात मोठ्या प्रमाणावर वैविध्य आहे. कितीतरी प्रकारची झाडं, प्राणी, पक्षी आपल्याला निसर्गात दिसतात. मात्र झाडे ही प्राण्यांपेक्षा वरच्या दर्जाची आहेत किंवा एका जातीचा पक्षी दुसऱ्या एका जातीच्या पक्षापेक्षा खालच्या दर्जाचा आहे असं निसर्ग आपल्याला सांगत नाही. निसर्गातलं वैविध्य खूप महत्त्वाचं आहे मात्र हे वैविध्य म्हणजे विषमता नव्हे. दर्जाचा लहान मोठेपणा हा माणसांनीच
ठरवला .त्यामुळे विषमता ही मानवनिर्मित आहे. विषमतेमुळे तयार झालेल्या उतरंडीमधील खालच्या थरातील माणसांना अपमानास्पद वागणूक मिळते, काही संधी त्यांना जन्मापासून नाकारल्या जातात. त्यामुळे अशी उतरंड अन्यायकारकच असते. प्रत्येक माणसाची माणूस म्हणून एक नैसर्गिक प्रतिष्ठा असते. प्रत्येकाला आत्मसन्मान असतो. मात्र भारतीय समाजात जात, लिंग आणि संपत्तीनुसार या प्रतिष्ठेचं असमान वितरण झालं आहे. इतिहासातून चालत आलेल्या शोषक व्यवस्थांमुळे झालेला अन्याय संपवणं आणि नव्याने अन्याय होऊ न देणं अशा सुधारक आणि प्रतिबंधात्मक रूपात न्यायाकडे पाहिलं जातं. इतिहासाचं
सम्यक आकलन आणि न्याय भविष्याचा वेध घेत आजच्या समाजातली धोरणं आखली जावीत अशा प्रकारे आपण न्यायाकडे पाहिलं पाहिजे.

या जयंती महोत्सवात विशेष अतिथी सरपंच, प्रियांका धावडे व पोंभुर्ले पंचायत समिती सदस्य सादिक डोंगरकर यांनी देखील उपस्थितांना महापुरुषांच्या विचारधारेनुसार वाटचाल करण्याचे आवाहन करून शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. जयंती महोत्सवामध्ये कुंदन सावंत,गोवळ यांनी रांगोळीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुंदर चित्र तर अनुभव शिक्षा केंद्राचा विद्यार्थी राहुल कांबळे यांनी ‘संविधान सेल्फी पॉईंट’ तयार करून जयंती महोत्सवाची शोभा वाढविली.जयंती महोत्सवासाठी तालुक्यातील गाव शाखांचे तसेच जिल्ह्यातील विविध संघटनांचे सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर सावंत यांनी केले तर आभार पांडुरंग कांबळे यांनी मानले.