देवगड पंचायत समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
देवगड /प्रतिनिधी
पंचायत समिती देवगड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पंचायत समिती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सन्मा .उपसभापती श्री .अमोल लोकेसाहेब यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती देवगडचे सन्मा .अधिक्षक कुणाल मांजरेकर, सन्मा . विस्तार अधिकारी (कृषी) अभिजीत मदने, सन्मा .विस्तार अधिकारी कृषी कोलते तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांच्या आदर्शांचे स्मरण केले.


