यंगस्टार प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन
देवगड / प्रतिनिधी
यंगस्टार प्रिमियर लिग (YPL) आमदार चषक २०२६’ या भव्य ऑल इंडिया ओपन डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार ॲड. अजित गोगटे व भाजपचे जेष्ठ नेते बाळ खडपे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी देवगड नगरपंचायतीचे स्वच्छता व आरोग्य सभापती व स्पर्धा आयोजक बुवा तारी, भाजपा देवगड जामसंडे शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, नगरसेवक तथा गटनेते शरद टूकरूल, नगरसेवक रोहन खेडेकर, संतोष तारी, उद्योजक एकनाथ तेली, नगरसेविका सौ. तन्वी चांदोसकर, पंचायत समिती सदस्या सौ. स्नेहा अनभवणे, यश रानडे, माजी नगरसेवक नीरज घाडी आदी उपस्थित होते.

माजी आमदार ॲड. गोगटे यांच्या हस्ते स्पर्धेचे दीपप्रज्वलन करून तर भाजप नेते बाळ खडपे यांच्याहस्ते मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मैदानात राष्ट्रगीत होऊन स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी आमदार ॲड अजित गोगटे म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तसेच भाजपाचे तालुका उपाध्यक्ष व देवगड जामसंडे नगरपंचायतीचे स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांच्या नेतृत्वाखाली यंगस्टार क्रिकेट क्लबने या स्पर्धेचे केलेले आयोजन खूपच सुंदर आहे. पर्यटनाची थीम या स्पर्धेसाठी वापरून एक वेगळा पायंडा घातला आहे, असेही ते म्हणाले.



