जेष्ट पत्रकार दयाळ कांबळे यांचे निधन
देवगड /प्रतिनिधी
देवगड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार व साप्ताहीक कोकणी दणकाचे संपादक दयाळ गणपत कांबळे (६७) यांचे बुधवारी रात्रौ १० वा. च्या दरम्यान आरे येथील निवासस्थानी दिर्घ आजाराने निधन झाले.
दयाळ कांबळे यांनी अनेक वर्षे पत्रकारीतेमध्ये काम केले होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम होते. स्पष्ट बक्तृत्व, निर्भिडतेपणाने त्यांनी आपल्या साप्ताहीकामध्ये लेखन केले होते. सुरूवातीला सिंधदुर्ग वृत्त साप्ताहीक सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी कोकणी दणका हे साप्ताहीक सुरू केले.
अनेक दिवाळी अंक त्यांनी प्रसिद्ध केले होते. देवगड तालुका पत्रकार संघाचे ते सलग दहा वर्षे अध्यश्न म्हणून त्यांनी काम केले होते. सलग ५० वर्षे त्यांनी पत्रकारीतेत कामकाज केले होते. पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबाबत त्यांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. राजकीय क्षेत्रातही त्यांच्या कामाचा ठसा उमटला आहे. आरपीआरचे देवगड तालुकाध्यश्न म्हणून काम केले होते त्यानंतर त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली होती.
त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी सकाळी ११ वाजता आरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक बिबाहीत मुलगी, भाऊ, पुतणे, जावई, नातवंडे, सुना असा मोठा परिवार आहे. देवगड पंचायत समितीच्या तळवडे मतदार संघाच्या सदस्या सौ. सलोनी तळवडेकर व कोकणी दणका साप्ताहीकाचे कार्यकारी संपादक रत्नदीप कांबळे यांचे ते वडील होते.


