आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त देवगडमध्ये रुग्णांना फळवाटप

देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजन
सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांची प्रमुख उपस्थिती
देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते व आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित देवगड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना मंगळवारी सकाळी फळ वाटप करून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सभापती गणेश राणे, शिवसेना तालुका प्रमुख व उपसभापती अमोल लोके, देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, युवा सेना तालुका प्रमुख दिनेश गांवकर, विभागप्रमुख दिनेश पारकर, साईनाथ काळे, देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटोदेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील आदी उपस्थित होते.



