देवगड / प्रतिनिधी
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीने ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन – २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीची भावना आणि किनारपट्टी सुरक्षेबाबत जनजागृती हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
हा कार्यक्रम शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता देवगड येथील विंडमिल गार्डन येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास संमती दर्शविली आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक तसेच दलातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. किनारपट्टी सुरक्षा, देशभक्ती आणि नागरिकांचा सहभाग यावर भर देत सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी ९८७१९८१७६४, ७९०८९७२८८२ आणि ९८३४६७२०२६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


