देवगडमध्ये २०० मच्छीमार बांधवांनी घेतला मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ

Google search engine

देवगडमध्ये २०० मच्छीमार बांधवांनी घेतला मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ

​पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले होते मोफत मच्छीमार सेवा शिबिर

 

देवगड: प्रतिनिधी 

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड येथे विशेष ‘मच्छीमार सेवा शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये देवगड तालुक्यातील तब्बल २०० मच्छीमार पुरुष आणि महिलांनी ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ तसेच ‘अपघाती विमा योजनांचा’ थेट लाभ घेतला. या शिबिराला स्थानिक मच्छीमार बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


​या महत्त्वपूर्ण शिबिराचे उद्घाटन माजी आमदार ॲड. अजित गोगटे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे यांच्या हस्ते करण्यात आले. मच्छीमार समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
​भाजप पदाधिकारी व मान्यवरांची मोठी उपस्थिती
​या प्रसंगी देवगड परिसरातील अनेक प्रमुख लोकप्रतिनिधी आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये:
​भाजप देवगड मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, पंचायत समिती सभापती गणेश राणे, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, देवगड मंडळ सरचिटणीस योगेश चांदोसकर.
​भाजप जिल्हा उपाध्यक्ष सौ. प्रियांका साळसकर, महिला तालुकाध्यक्ष उष:कला केळुस्कर, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर. ​माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका ॲड. प्रणाली माने, पाणी पुरवठा सभापती व नगरसेविका तन्वी चांदोसकर, ऋचाली पाटकर, मनीषा जामसंडेकर. युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, माजी शहर अध्यक्ष योगेश पाटकर, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, नगरसेवक संतोष तारी, गटनेते शरद टूकरूल, रोहन खेडेकर , स्वच्छता सभापती बुवा तारी. ​माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर, माजी नगरसेवक व्हि. सी. खडपकर, ज्ञानेश्वर खवळे, सुभाष धुरी, बापू जुवाटकर, तसेच मिलिंद माने, अक्षता घाडी, पंकज दुखंडे आणि उल्हास मणचेकर.
​या शिबिरासाठी मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देवगड तालुक्यातील ग्रामस्थ व मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.