पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त पडेल येथे वीज ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण

Google search engine

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त पडेल येथे वीज ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण 

सरपंच भूषण पोकळे यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार 

 

देवगड / प्रतिनिधी

पालकमंत्री तसेच मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे सयांच्या माध्यमातून जिल्हावार्षिक योजनेतून खूप वर्ष प्रलंबित असलेले पडेल खालचावठार येथील नवीन ट्रांसफर्मर मंजूर करण्यात येऊन त्याचे काम पूर्ण झाले. या ट्रान्सफॉर्मर लोकार्पण सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला.

पडेल खालचावठार येथील रहिवाशी ग्रामस्थ यांची गेले खूप वर्ष विधुत पुरवठा अनियमित होता या बाबत ग्रामस्थांची समस्या होती.हि समस्या सरपंच भुषण पोकळे व ग्रामपंचायत पडेल यांनी हि समस्या पालक मंत्री साहेब यांच्या कडे मांडली व या कामा संदर्भात पाठपुरावा केला व याची दाखल घेत पालकमंत्री साहेबांनी 25 लाख निधी मंजूर केला व काम पूर्ण झाले या बद्दल सर्व ग्रामस्थांन मधून समाधान व्यक्त होत आहे.गावाच्या वतीने साहेबांचे आभार मानत आहेत.

या वेळी उपस्थित सरपंच भुषण पोकळे, पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरूल,उपसरपंच विश्वनाथ पडेलकर,श्रीपाद मराठे,मधुसूदन काळे,नारायण बाणे,जयेश तानवडे, विद्याधर देवधर,सुयश मराठे,सचिन देवधर,प्रसन्ना देवधर,संतोष गोठणकर,सुद्धाकर बाणे,तुकाराम गोठणकर,संकेत बाणे,विनायक देवधर,अक्षय बाणे,राजेंद्र तानवडे,रमेश बाणे,बाळा अनभवणे कॉन्ट्रॅक्टर भोकटे,तसेच महावितरण चे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते