​पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २१ जूनला मोफत छत्री वाटप

Google search engine

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २१ जूनला मोफत छत्री वाटप

नगरसेविका ॲड. प्रणाली माने व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माने यांचे आयोजन

 

देवगड: प्रतिनिधी 

मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा देवगड-कणकवली-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका व माजी नगराध्यक्षा ॲड. प्रणाली माने यांच्यामार्फत देवगड येथे मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

​हा कार्यक्रम रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता देवगड येथील प्रभाग ९ मध्ये ‘महापुरुष पार, जगतापवाडी’ येथे पार पडणार आहे.

​लोकप्रतिनिधींकडून अनोखी शुभेच्छा

​जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असणारे लाडके आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन नागरिकांसाठी या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

​या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मिलिंद आ. माने आणि देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा, माजी सभापती (पाणी पुरवठा व जलनिसारण समिती) तथा वॉर्ड क्र. ०९ च्या विद्यमान नगरसेविका ॲड . सौ. प्रणाली मिलिंद माने यांच्या मार्फत करण्यात आले आहे.