मिठबाव रवळनाथ मंदिरात आज गावमेळ्याचे आयोजन

Google search engine

 मिठबाव रवळनाथ मंदिरात आज गावमेळ्याचे आयोजन

देवगड / प्रतिनिधी
मिठबाव कातवण आणि तांबळडेग या तिन्ही  गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देव रवळनाथ, ग्रामदेवता श्री गजबादेवी माता या देवस्थान संदर्भात काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी गुरुवार १८ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता गावमेळा (सभा)श्री देव रवळनाथ मंदिरात आयोजित करण्यात आलेला आहे. 
       तरी सर्व बारापाच मानकरी सर्व देवसेवक गावघर,गावरयत यांनी या सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहन श्री देव रामेश्वर समिती मिठबावच्या वतीने करण्यात आले आहे