श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेलचा १००% निकाल

Google search engine

श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेलचा १००% निकाल

प्रेम सावंत विद्यालयात प्रथम

 

पडेल / प्रतिनिधी

पडेल ग्रामसुधारणा मंडळ, मुंबई संचलित श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल या विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम राखत मार्च २०२६ च्या एस.एस.सी. (SSC) बोर्ड परीक्षेत १००% निकालाची नोंद केली आहे. विद्यालयातील सर्व ४५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे.

​विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशामध्ये कु. प्रेम प्रदिप सावंत याने ५०० पैकी ४४२ गुण (८८.४०%) मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. तसेच कु. निधि महेश घाडी हिने ४३५ गुण (८७.००%) मिळवून द्वितीय क्रमांक, तर कु. रितेश श्रीहरी मणचेकर आणि कु. मनश्री संतोष यादव या दोघांनी प्रत्येकी ४३२ गुण (८६.४०%) मिळवून विभागून तृतीय क्रमांक संपादन केला आहे.

​विद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल पडेल ग्रामसुधारणा मंडळ, मुंबईचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाने पडेल परिसराच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.