राज्ञी कुलकर्णी १०० टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम

Google search engine

राज्ञी कुलकर्णी १०० टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम

देवगडच्या शेठ म.ग. हायस्कूलचा ९७.५३ टक्के निकाल

 

देवगड: /प्रतिनिधी 

माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, देवगड येथील शेठ म.ग. हायस्कूलने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा एकूण निकाल ९७.५३ टक्के लागला आहे. या परीक्षेत शाळेची विद्यार्थिनी कुमारी राज्ञी विवेक कुलकर्णी हिने १०० टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवित जिल्ह्यात प्रथम आली आहे.

​शाळेतून एकूण १६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ६३ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, ५० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ३९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर ६ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी मिळवली आहे.

​शाळेतील पहिले पाच क्रमांक खालीलप्रमाणे आहेत: १. कुमारी राज्ञी विवेक कुलकर्णी (१००%), २. कुमारी प्राजक्ता केदार भिडे (९८.२०%), ३. कुमारी दिया गणेश गावकर (९८%), ४. योगिनी संजय मेस्त्री (९७.२०%), ५. दीक्षा विवेक मेस्त्री (९५.८०%) ​विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, संस्था पदाधिकारी आणि पालक यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.