वानिवडे-सरवणकरवाडी येथे १.६२ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
देवगड / प्रतिनिधी
मत्स्यउद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. नितेशजी राणे यांच्या विकास निधीतून (मंजूर निधी १,६२,२४,३२०/-) मौजे वानिवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सरवणकरवाडी येथे अस्तित्वातील रस्ता व संरक्षण भिंतीच्या दुरुस्ती व मजबुतीकरण कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा गुरुवार, ७ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला.
सदर कामाचे भूमिपूजन देवगड पंचायत समितीचे सभापती मा. गणेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जि.प. सदस्य कु. सुयोगी घाडी, सरपंच सौ. मेघा सरवणकर, माजी सरपंच श्री. पप्पू लाड, बूथ अध्यक्ष श्री. प्रल्हाद घाडी, श्री. श्रीकृष्ण धुरी, गाबीत समाज समस्या निवारण मंचाचे श्री. सूर्यकांत खवळे (अध्यक्ष, खवळे महागणपती ट्रस्ट), श्री. संजय बांदेकर, श्री. गुरुनाथ तारी आणि श्री. गणेश कुबल उपस्थित होते.
तसेच श्री. संतोष जुवाटकर, सिंधुसेवा प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश सरवणकर, मानखुर्द बूथ अध्यक्ष श्री. प्रदीप हरम, श्री. तानाजी साटम, श्री. रामदास करंजे, श्री. अनंत करंजे, सरवणकर परिवाराचे पाटील श्री. पिलाजी सरवणकर, ज्येष्ठ नागरिक श्री. ज्ञानदेव सरवणकर, श्री. अनंत सरवणकर, श्री. अशोक सरवणकर, श्री. राजेंद्र सरवणकर, श्री. विलास सरवणकर, श्री. विनायक सरवणकर, श्री. नंदकुमार सरवणकर यांच्यासह सरवणकर परिवारातील अन्य सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यामुळे या भागातील रस्त्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागणार असून ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.


