वादळी वाऱ्याने देवगड बाजारपेठ रस्त्यावर झाड कोसळले

Google search engine

वादळी वाऱ्याने देवगड बाजारपेठ रस्त्यावर झाड कोसळले

काही काळ वाहतूक ठप्प, नगरपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी झाड हटवून वाहतूक पूर्ववत

 

देवगड / प्रतिनिधी

गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने देवगड खालची बाजार पेठ कडे जाणाऱ्या रस्त्यावर कडेला असलेले जुने आंब्याचे कोसळले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून मात्र काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

देवगड एस टी स्टँड ते खालची बाजार पेठ हा रहदारीचा रस्ता आहे. सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली होती. तातडीने देवगड जामसंडे नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य करून रस्त्यावर असलेले झाडाच्या तोडून रस्त्याच्या बाजूला केले त्यानंतर दोन्ही बाजूचे वाहतूक सुरळीत सुरू झाली सुदैवाने कोणतेही जीवित अथवा आर्थिक हानी झालेली नाही.