ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या देवगड तालुकाध्यक्षपदी आदित्य कदम
तर उपाध्यक्षपदी उमर अली मुल्लानी बिनविरोध
देवगड : प्रशांत वाडेकर
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (DNE १३६) या संघटनेच्या रिक्त असलेल्या देवगड तालुकाध्यक्षपदी आदित्य संतोष कदम व उपाध्यक्षपदी उमर अली मुल्लानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
देवगड पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात बुधवारी जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, तालुकाध्यक्षपदी आदित्य संतोष कदम, उपाध्यक्षपदी उमर अली मुल्लानी तर कायदेविषयक सल्लागार पदी विजय मलगुंडे यांची सर्वसंमतीने बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष रेश्मा गोवळकर, जिल्हा संघटक उज्वल झरकर, कणकवली तालुका अध्यक्ष वैभव धुमाळे, कणकवली तालुका सचिव वैभव ठाकूर, सदस्य मंगेश राणे, देवगड तालुका सचिव श्रद्धा वळंजू तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. या नवनिर्वाचित निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
देवगड पंचायत समिती कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधिक्षक कुणाल मांजरेकर, कनिष्ट लेखाधिकारी विनय प्रभू यांनी नूतन तालुका अध्यक्ष आदित्य कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


