दुकानात शिरली फॉर्च्यूनर

Google search engine

 दुकानात शिरली फॉर्च्यूनर

मुंबई गोवा महामार्गावरील घटना

 

खेड:  कोकण वार्ता वृत्तसेवा 

मुंबई गोवा महामार्गावरील कळंबनी येथे असणाऱ्या कळंबनी उपजिल्हा रुग्णालयासमोरील एका हॉटेल व घरामध्ये भरधाव वेगातील फॉर्च्यूनर कार शिरली. यामध्ये कार सह दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बाजूला असणाऱ्या दुकानात ही कार शिरल्याने ही मोठी दुर्घटना घडली असून खेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कोणालाही इजा व दुखापत झालेली नाही या अपघाताचा अधिक तपास सध्या खेड पोलीस करत आहेत