देवगड शहरातील रिक्षा चालकांना मोफत पेट्रोल व डिझेल वाटप
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी व माजी नगराध्यक्षा ॲड. प्रणाली माने यांच्यावतीने आयोजन
देवगड/ प्रतिनिधी
कोकणचे भाग्यविधाते, केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड शहरातील रिक्षा व्यावसायिकांना मोफत पेट्रोल व डिझेलचे वाटप करण्यात आले. देवगड नगरपंचायत स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी आणि माजी नगराध्यक्षा ॲड. प्रणाली माने यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाचा शुभारंभ माजी आमदार ॲड. अजित गोगटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, गटनेते शरद टूकरूल, महिला तालुका अध्यक्षा उष कला केळुस्कर, महिला शहराध्यक्षा तन्वी शिंदे, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, नगरसेवक संतोष तारी, रोहन खेडेकर, स्वरा कावले, सौ. भडसाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला शिवाजी कांदळगावकर, श्रुती जाधव, राजा वालकर, उमेश कनेरकर, सुभाष धुरी, व्ही. सी. खडपकर, रवींद्र कोयंडे, धर्मराज जोशी, ॲड. सिद्धेश माणगावकर, उल्हास मणचेकर, ज्ञानेश्वर खवळे, बापू जुवाटकर, निनाद देशपांडे यांच्यासह कार्यकर्ते आणि रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने रिक्षा चालकांना मदतीचा हात दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानण्यात आले.


